भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना सुरु आहे. या टेस्ट सामन्यामध्ये टीम इंडियाची पोलखोल झाली आहे. अवघ्या १५० रन्सवर टीम इंडियाचा ऑल आऊट झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ रन्सची खेळी केली आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडिया जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पुन्हा एकदा फेल गेले आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियाच्याच अंगाशी आल्याचं दिसून आली. संपूर्ण टीम अवघ्या १५० रन्सवर माघारी परतली आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वाल भोपळाही फोडू शकला नाही. मिचेल स्टार्कने त्याची विकेट घेतली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. तो अवघ्या पाच रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. जोश हेजलवूडने विराटला उस्मान ख्वाजाच्या हाती कॅच आऊट केलं.
कर्णधार रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने 74 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 26 रन्स केले. त्यानंतर ध्रुव जुरेल 11 रन्स आणि वॉशिंग्टन सुंदर ४ रन्सवर बाद झाले. 73 धावांवर 6 विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी यांनी डाव सांभाळला. या दोघांनीही सातव्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशिप केली. पंत 78 बॉल्समध्ये 3 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 37 रन्स केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.