team india google
Sports

IND vs AFG, Playing XI: आज रंगणार भारत- अफगाणिस्तान सामन्याचा थरार! रोहित प्रमुख खेळाडूला बसवणार?

IND vs AFG,Playing 11 Prediction: आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये आज सुपर ८ फेरीतील सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना बारबाडोसमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही संघात आक्रमक फलंदाज भेदक वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या सामन्यातही विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. हे दोघेही अनुभवी आणि विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे दोन्ही फलंदाजांकडून आक्रमक सुरुवात करून देण्याची अपेक्षा असणार आहे. या सामन्यातही रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर येऊ शकतो. फलंदाजीसह यष्टिरक्षणातही त्याने शानदार कामगिरी केली आहे.

या सामन्यात सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव हा टी -२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज आहे. जो कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन सामना फिरवू शकतो.

स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला या सामन्यातही पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. तो मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी करू शकतो. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या खेळताना दिसेल. सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी रविंद्र जडेजा किंवा अक्षर पटेलपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवचा संघात समावेश केला जाऊ शकतो.वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश केला जाऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Father Of Anushka Sharma: कडक शिस्त अन् देशाचे संरक्षक, अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील काय काम करायचे ?

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

SCROLL FOR NEXT