धर्मशालाच्या मैदानावर आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक वनडे सिरीजला सुरुवात होणार असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागलंय. 2027 च्या वनडे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही तीन सामन्यांची सिरीज दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची मानली जातेय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या भारतीय टीमसमोर काही महत्त्वाची आव्हानं असणार आहेत.
अफगाणिस्ताविरूद्धच्या या सिरीजमध्ये भारताला दोन प्रमुख खेळाडूंची उणीव भासणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑलराऊंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे टीमबाहेर आहेत. त्यामुळे पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून तो टीममध्ये दाखल झालाय. त्यामुळे रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून ओपनर म्हणून सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत ओपनर म्हणून 45 शतकं लगावली आहेत. रोहित शर्मा याच्याही नावावर सध्या 45 शतकं आहेत आणि तो सचिनच्या बरोबरीत आहे.
आजच्या सामन्यात रोहित शर्माने आणखी एक शतक झळकावलं तर तो ओपनर म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय फलंदाज ठरणार आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोहलीच्या जागी टीममध्ये संधी मिळालेल्या यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे. याशिवाय केएल राहुल हाही या क्रमांकासाठी पर्याय ठरू शकतो.
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका स्पष्ट केलीये. ईशान किशन, केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या तिघांनाही सिरीजदरम्यान तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी संधी मिळू शकते. तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. तर विकेटकीपर फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत नवा ऑलराऊंडर नीतीश कुमार रेड्डी याला संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर सातव्या क्रमांकावर खेळू शकतो.
गोलंदाजीमध्ये कुलदीप यादव प्रमुख स्पिनर म्हणून टीममध्ये असण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या खांद्यावर असणार आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा प्रिन्स यादव किंवा गुरनूर ब्रार यापैकी एकाला आंतरराष्ट्रीय डेब्यूची संधी मिळू शकते.
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव / गुरनूर ब्रार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.