India vs Afghanistan Saam tv
क्रीडा

India vs Afghanistan: दुसऱ्या टी-२० सामन्यात नायबची दमदार फलंदाजी; अफगाणिस्तानचं टीम इंडियाला १७३ धावांचं आव्हान

Vishal Gangurde

India vs Afghanistan 2nd T20I Cricket Score:

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचा दुसरा सामन्यात अफगाणिस्तानच्या दमदार फलंदाजी केली. या डावात नायबच्या अर्धशकताच्या जोरावर अफगाणिस्तानने टीम इंडियाला १७३ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. अफगाणिस्तानने २० षटकात १७२ धावा केल्या.

गुलबदीन नायबने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. नजीबुल्लाह जादारनने २३ धावा, रीम जनतने २९ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंहने तीन गडी बाद केले. तर रवि बिश्नोई आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अफगाणिस्तानची खराब सुरुवात

फिरकीपटू रवि बिष्णोईने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानुल्लाह गुरबाजला बाद केले. त्याने ९ चेंडूत १४ धावा केल्या. अफगाणिस्तानला दुसरा धक्का इब्राहिम जादरानच्या रुपात बसला. अक्षर पटेलने सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इब्राहिम जादरानला बाद केले. त्याने १० धावा कुटल्या. शिवम दुबने अफगाणिस्तानला तिसरा धक्का दिला.

सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजमतुल्लाह उमरजई बाद झाला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पडझड झाल्यानंतर नायबने संघाची कमान सांभाळली. नायबने अर्धशतकी खेळी खेळली. अक्षर पटेलने नायबला बाद केले. नायबने ३५ चेंडूत ५७ धावा केल्या. १५ व्या षटकार्यंत अफगाणिस्तानचा निम्मा संघ बाद झाला होता. अर्शदीपने १८ व्या षटकात नजीबुल्लाला बाद केले. या सामन्यात अर्शदीपने चार गडी बाद केले. तर अफगाणिस्तानने २० षटकात १७२ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT