India U19 players celebrate after sealing a historic run chase to enter the World Cup final. Saam Tv
Sports

UNDER 19 क्रिकेटमध्ये भारताचा डंका, विजेत्यापासून एक पाऊल दूर

India U19 World Cup 2026 Semi Final Result: अंडर 19 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने अफगाणिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. एरॉन जॉर्जच्या शतकामुळे भारत आता सहाव्या विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे.

Omkar Sonawane

भारत अंडर 19 संघाने अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला

311 धावांचे लक्ष्य पार करत भारताने ऐतिहासिक विक्रम केला

एरॉन जॉर्जचे शतक आणि वैभव सूर्यवंशीची झंझावाती खेळी

भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना शुक्रवारी होणार

अंडर 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये 2026 च्या स्पर्धेत भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात आपली जागा निश्चित केली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात सेमी फायनलमध्ये भारताने अफगाणिस्तानला 7 विकेट्सने धूळ चारत 10 व्यादा अंतिम सामना गाठला आहे. भारताच्या विजयात एरॉन जॉर्जने शतक करत धमाकेदार कामगिरी केली आहे.

आता सहाव्यांदा भारतीय संघ विजेतेपद मिळवण्यासाठी उत्साही असेल. शेवटचा सामना शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पराभूत करत शेवटच्या सामन्यात प्रवेश केला आहे.बुधवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्षावर मात करत 41.1 षटकात 3 विकेट्सने गमावून पूर्ण केला. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये हा सर्वात मोठे लक्ष पार करणारा सामना होता.

याआधी कोणत्याच संघाने इतके मोठे लक्ष पार केले नव्हते. हा विक्रम यापूर्वी न्यूझीलंडच्या नावावर होता. 2006 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ३०५ धावांवर मात केली होती.

भारताकडून एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांनी सामना सुरू केला होता. दोघांनीही चांगली सुरुवात केली. वैभव जोरदार खेळत असताना दुसऱ्या बाजूने त्याला जॉर्ज साथ देत होता. वैभवने 24 चेंडूत अर्धशतकही केले. पण आक्रमक खेळणाऱ्या वैभवला 10 व्या शतकात नुरीस्तानी ओमर झाईने ओस्मान सादातच्या हातून झेलबाद केले. वैभवने 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. त्याने जॉर्ज सोबत 90 धावांची भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा अपघात की घातपात? लवकरच 'तो' रिपोर्ट समोर येणार, VIDEO

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा, कोणत्या अटींमुळे रखडलं विलिनीकरण?

अजितदादांच्या विमानातून कुणाची उडी? राष्ट्रवादीच्या आमदाराची धक्कादायक माहिती

हवाई उड्डाण अचानक रद्द; मंत्री गुलाबराव पाटील कारने निघाले, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अजित पवार अपघात प्रकरण : ब्लॅक बॉक्स'मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात

SCROLL FOR NEXT