team india saam tv
क्रीडा

IND VS WI: नवे हंगाम,नवी सुरुवात! WTC गमावल्यानंतर टीम इंडिया करणार 'या' देशाचा दौरा; पाहा संपुर्ण वेळापत्रक

India Tour Of West Indies: लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं हंगाम सुरू होणार आहे

Ankush Dhavre

Ind Tour Of West Indies Full Schedule: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया कडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला सलग दुसरी संधी मिळाली होती.

मात्र ही संधी देखील हुकली आहे. आता भारतीय संघ वेस्ट इंडिज संघासोबत दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं हंगाम सुरू होणार आहे. भारतीय संघ या हंगामाची सुरूवात वेस्ट इंडिज विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतुन करणार आहे. या दौऱ्यावर कसोटीसह वनडे आणि टी-२० मालिका देखील खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेतील २ सामने हे अमेरीकेतील फ्लोरीडामध्ये खेळवले जाणार आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर बीसीसीआयने या मालिकेची घोषणा केली आहे. येत्या १२ जुलै पासुन कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. हा कसोटी सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कमध्ये रंगणार आहे.

तर दुसरा कसोटी सामना हा २० जुलैपासुन त्रिनिदाद मधील प्रसिद्ध क्विंस पार्कच्या ओव्हल स्टेडिअममध्ये रंगणार आहे.

तब्बल एक महिना सुरू राहणाऱ्या या दौऱ्यावर ३ वनडे सामने देखील खेळवले जाणार आहेत. या मालिकेची सुरूवात २७ जुलैपासुन होणार आहे. तर १ ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवट होणार आहे.

त्यानंतर ३ ऑगस्टपासुन ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील २ सामने हे अमेरीकेतील फ्लोरीडामध्ये खेळवले जाणार आहेत. यापुर्वी देखील भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ फ्लोरीडामध्ये आमने सामने आले आहेत. (Latest sports updates)

असे आहे संपुर्ण वेळापत्रक..

कसोटी मालिका.

पहिला कसोटी सामना- १२ ते १६ जुलै, विंडसर पार्क

दूसरा कसोटी सामना - २० ते २४ जुलै, क्विंस पार्क ओव्हल, त्रिनिदाद

वनडे मालिका

पहिला वनडे सामना- २७ जुलै, केन्सिंगटन ओव्हल, बारबडोस

दूसरावनडे- 29 जुलाई, केन्सिंगटन ओवल, बारबडोस

तिसरा वनडे सामना- १ ऑगस्ट, ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

टी-२० मालिका

पहिला टी-२० सामना- ३ ऑगस्ट, ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

दूसरा टी-२० सामना- ६ ऑगस्ट, नॅशनल स्टेडियम, गयाना

तिसरा टी-२० सामना- ८ ऑगस्ट, नॅशनल स्टेडियम, गयाना

चौथा टी-२० सामना- १२ ऑगस्ट, ब्रोवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल फ्लोरिडा

पाचवा टी-२० सामना- १३ ऑगस्ट, ब्रोवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल फ्लोरिडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT