Shafali Verma  saam tv
Sports

Do Or Die: मिताली, मानधना, शेफालीची दमदार कामगिरी; दक्षिण आफ्रिकेस २७५ धावांचे आव्हान

शेवटच्या दहा षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गाेलंदाजांनी भारतीय संघास राेखत केवळ ५१ धावा दिल्या.

साम न्यूज नेटवर्क

ख्राईस्टचर्च : महिला विश्वकरंडक (ICC Women's World Cup 2022) स्पर्धेत आज भारतीय संघापुढं 'जिंकू किंवा मरु' अशी स्थिती असल्याने फलंदाजीत उत्तम कामगिरी साधलेल्या टीम इंडियानं (India) दक्षिण आफ्रिकेपुढे (south africa) २७५ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताच्या ५० षटकात सात बाद २७४ धावा झाल्या आहेत. (icc womens world cup cricket latest marathi news)

कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय संघासाठी फायदेशिर ठरला. कर्णधार मिताली राजने (mithali raj) तिचे ६४ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. आतापर्यंतची स्पर्धेतील तिची सर्वोत्तम खेळी ठरली.

शफाली वर्माने (shafali verma) स्मृती मानधनासोबत (smriti mandhana) ९१ धावांची भागीदारी करण्यापूर्वी ४६ चेंडूत ५३ धावा करत संघास दमदार सुरुवात करून दिली. फॉर्ममध्ये असलेल्या यास्तिका भाटिया (yastika bhatia) लवकर बाद झाली. मात्र मिताली आणि मानधना यांनी उत्तम खेळी करीत संघास मजबूत स्थितीत आणले. मंधाना ८४ चेंडूत ७१ धावांवर बाद झाल्यानंतर मितालीने एक बाजू उत्तम सांभाळली.

दरम्यान अंतिम १० षटकां दक्षिण आफ्रिकेच्या गाेलंदाजांनी भारतास राेखले. या दहा षटकांत भारतीय संघाच्या केवळ ५१ धावा झाल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेसमाेर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. झुलन गोस्वामीची अनुपस्थिती भारतीय गाेलंदाजांना किमया दाखवावी लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT