IND vs PAK saam tv
Sports

IND vs PAK : "भारत हरलाच पाहिजे..." माजी क्रिकेटपटूच्या या विधानाने खळबळ; पाकिस्तानच्या विजयामागचं लॉजिक काय?

क्रिकेटच्या मैदानावरील कोणत्याही भारतीय चाहत्याला पाकिस्तानविरुद्ध टीम पराभूत व्हावा असं मनातंही येत नाही. मैदानावर क्रिकेट सोडून कोणत्याही प्रकारचा सामना असला तरी टीम इंडियाचाच विजय व्हावा असं सर्वांन मनात असतं.

Surabhi Jayashree Jagdish

आज क्रिडाप्रेमींसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे, याचं कारण म्हणजे दुबईच्या मैदानावर आज भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. सर्वजण आतुरतेने या सामन्याची वाट पाहत होते. या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून भारताचा विजय व्हावा हीच सर्वांची इच्छा आहे. मात्र भारताच्या एका माजी खेळाडूला या सामन्यात पाकिस्तानचा विजय व्हावा असं वाटतंय.

क्रिकेटच्या मैदानावरील कोणत्याही भारतीय चाहत्याला पाकिस्तानविरुद्ध टीम पराभूत व्हावा असं मनातंही येत नाही. मैदानावर क्रिकेट सोडून कोणत्याही प्रकारचा सामना असला तरी टीम इंडियाचाच विजय व्हावा असं सर्वांन मनात असतं. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू जीवाची बाजी लावतात. पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पराभूत व्हावं अशी भारताच्या एका माजी क्रिकेटपटूची इच्छा आहे. हे ऐकायला खूप विचित्र आहे, पण दुबईत भारतीय टीमने पाकिस्तानविरुद्ध पराभूत व्हावं अशी त्यांची इच्छा आहे.

काय म्हणाले अतुल वासन?

अतुल वासन असं या माजी भारतीय क्रिकेटरचं नाव आहे. अतुल वासन यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर आपलं मत मांडताना एका वेगळ्या प्रकारचा थियोरी मांडली आहे. दुबईत टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध हरली झाल्यास ही स्पर्धा अधिक रोमांचक होईल, असं अतुल वासन यांना वाटते.

अतुल वासन म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात खूप कमी सामने खेळले जातात. अशा तऱ्हेने या दोन्ही टीम्समधील संघर्षाचा थरारही चाहत्यांना कमी पहायला मिळतो. पाकिस्तान हा भारतापेक्षा खूपच कमकुवत संघ आहे. टीम इंडियाने यजमानसंघावर एकतर्फी विजय मिळवला तर स्पर्धेचा थरार संपुष्टात येईल.

वासन म्हणाले, 'या स्पर्धेत पाकिस्तानसाठी 'करो या मरो'चा हा सामना आहे. जर पाक भारताकडून पराभूत झाली तर ती सेमीफायनलमधून बाहेर पडेल. पण जर तो जिंकला तर चाहत्यांना पुन्हा या दोन टीममधील टक्कर पाहायला मिळेल जी क्रिकेटसाठी चांगली असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने २३ फेब्रुवारीला होणारा सामना जिंकावा, अशी माझी इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT