Akshata Dhekale Saam Tv
Sports

महिला विश्वकरंडक हाॅकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; फलटणच्या अक्षता ढेकळेचा समावेश

अनुभवी आणि प्रतिभावंत युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

सातारा (Satara Latest Marathi News) : FIH महिला हॉकी विश्वकरंडक स्पर्धेसाठी (FIH Women's Hockey World Cup) हॉकी इंडियाने (Hockey India) भारतीय महिला हॉकी संघाची (Indian Women's Hockey Team) घाेषणा केली. ही स्पर्धा नेदरलँड्स आणि स्पेन येथे एक ते 17 जुलै या कालावधीत हाेणार आहे. या संघात 20 खेळाडूंचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (phaltan) तालुक्यातील अक्षता आबासाे ढेकळे (Akshata Abaso Dhekale) हिचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचे (Indian Hockey Team) नेतृत्व दिग्गज गोलरक्षक सविता (Savita) आणि उपकर्णधार दीप ग्रेस एक्का (Deep Grace Ekka) करणार आहेत. (Akshata Dhekale Latest Marathi News)

लंडन येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला हाेता. निर्घारित वेळेत 0-0 असा गुणफलक राहिला. शूटआउटमध्ये संघास आयर्लंडने 3-1 ने पराभूत केले. त्यानंतर आयर्लंडने विश्वकरंडकाचा अंतिम सामना खेळला. सध्याच्या संघ निवडीबद्दल मुख्य प्रशिक्षक जेनेके शॉपमन (Janneke Schopman) म्हणाले, "आम्ही विश्वकरंडक स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडला आहे. हा अनुभवी आणि प्रतिभावंत युवा खेळाडू यांचे मिश्रण असेला संघ आहे ज्यांनी FIH प्रो लीगमध्ये अव्वल संघांविरुद्ध संधी दिल्यावर उत्तम खेळ केला हाेता.

दुखापतीतून सावरलेली राणी वगळता, संघात ऑलिम्पिकपटू ज्योती आणि सोनिका या खेळाडूंचा संघात समावेश आहे ज्यांनी संधी दिल्यावर त्यांची चांगली कामगिरी केली हाेती. संगीता आणि अक्षता ढेकळे या बदली खेळाडू म्हणून आमच्यासमवेत राहतील. भारतीय हाॅकी संघ त्यांचे गटातील सामने ऍमस्टेलवीन, नेदरलँड्स येथे खेळतील आणि जर ते गटात अव्वल ठरले तर ते उपांत्यपूर्व फेरीतही ऍमस्टेलवीन येथे खेळतील.

FIH Women's Hockey World Cup

FIH महिला विश्वकरंडक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय महिला हाॅकी संघ

गोलरक्षक:

1. सविता (C)

2. बिचू देवी खरीबम

बचावकर्ते:

3. दीप ग्रेस एक्का (VC)

4.गुरजित कौर

5.निक्की प्रधान

6.उदिता

मिडफिल्डर:

7. निशा

8. सुशीला चानू पुक्रंबम

9. मोनिका

10. नेहा

11. ज्योती

12. नवज्योत कौर

13. सोनिका

14. सलीमा टेटे

फॉरवर्ड:

15. वंदना कटारिया

16. लालरेमसियामी

17. नवनीत कौर

18. शर्मिला देवी

बदली खेळाडू:

19. अक्षता आबासो ढेकळे

20.संगिता कुमारी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT