team india saam tv
Sports

IML 2025: टीम इंडियाकडे आणखी एक ट्रॉफी जिंकण्याची संधी; फायनलमध्ये या संघासोबत भिडणार

India Masters vs West Indies Masters Final: इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि वेस्टइंडिज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट संघाने गेल्या वर्षभरात २ मोठ्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आयसीसी टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला. आता भारतीय संघाकडे आणखी एक ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. कोणती आहे ती ट्रॉफी? आणि केव्हा होणार फायनल? जाणून घ्या.

भारतीय संघाकडे आणखी एक ट्रॉफी जिंकण्याची संधी..

दिग्गज भारतीय खेळाडूंचा संघ इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेत जगातील ५ संघांनी सहभाग घेतला. ज्यात भारतासह , दक्षिण आफ्रिका, ऑस्टेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे वेस्टइंडिज आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात वेस्टइंडिजने विजय मिळवत फायलनचं तिकीट मिळवलं.

दोन्ही संघ फायनल खेळण्यासाठी सज्ज झाले असून हा सामना १६ मार्चला रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.

वेस्टइंडिजचा दमदार विजय

दुसऱ्या सेमीफायनल सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात वेस्टइंडिज मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंका मास्टर्सने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात वेस्टइंडिज मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ५ गडी बाद १७९ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार ब्रायन लाराने ४१ धावांची खेळी केली. तर रामदीनने २२ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी केली.

श्रीलंका मास्टर्सला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात १८० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना, गुणरत्नेने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT