India vs New Zealand 5th T20I match result BCCI
Sports

NZ vs IND : अखेरच्या टी२० सामन्यात भारताचा पराभव, पण मालिका जिंकली, न्यूझीलंडचा शेवट गोड

India vs New Zealand 5th T20I : भारताला अखेरच्या टी२० सामन्यात न्यूझीलंडकडून ७ विकेटने पराभव स्वीकारावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करत १९१ धावा केल्या होत्या. टीम सायफर्टच्या ९३ आणि ग्लेन फिलिप्सच्या नाबाद ६५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने लक्ष्य गाठले. मात्र भारताने पाच सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली.

Namdeo Kumbhar

India vs New Zealand 5th T20I match result : अखेरच्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ७ विकेट आणि १२ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह यजमान न्यूझीलंडने मालिकेचा शेवट गोड केला, पण भारताने ५ सामन्यांची टी-२० मालिका ३-२ ने खिशात घातली. चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली.

अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. १९२ धावांचे हे आव्हान न्यूझीलंडने १८ व्या षटकात ३ विकेटच्या मोबदल्यात पार केले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी केली. त्याने चौथ्या सामन्यातही शतकी खेळी करत न्यूझीलंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांच्या बळावर १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा या आघाडीच्या फलंदाजांना शेवटच्या सामन्यात प्रभावी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळेच भारताच्या धावसंख्येला लगाम लागला. त्यातच तिलक वर्मा यालाही डावाला आकार देता आला नाही. संजू सॅमसन (४), अभिषेक शर्मा (१) आणि तिलक वर्मा (६) हे फलंदाज अपयशी ठरले. नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांनी अखेरच्या षटकांत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, पण फटकेबाजीच्या नादात त्यांना विकेट गमावावी लागली. नमन धीर याने ३३ तर रेड्डीने २२ धावांचे योगदान दिले.

न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने याने ४ षटकांत फक्त १९ धावा खर्च करत ४ विकेट घेतल्या. नेथन स्मिथ आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

भारताने दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. फिन आलन फक्त २ धावा काढून अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण त्यानंतरही न्यूझीलंडने धावसंख्या थांबू दिली नाही. टीम सायफर्ट आणि डॅरेल मिचेल यांनी डावाची सूत्रे हातात घेतली. दोघांनी महत्त्वाची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. डॅरेल मिचेल बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स याने डावाची सूत्रे हातात घेतली. टीम सायफर्ट आणि फिलिप्स यांनी दमदार अर्धशतके ठोकत विजय सुकर केला. सायफर्ट ९३ धावा काढून बाद झाला, तर फिलिप्स ६५ धावा काढून नाबाद राहिला.

भारताकडून अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली, पण इतर गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि प्रिन्स यादव यांना विकेट घेता आली नाही, त्याशिवाय धावा रोखण्यातही ते अपयशी ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डधारकांना मोठा धक्का! ५३ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद, नवीन नियम लागू

देशावर पुन्हा चक्रीवादळाचं संकट! अनेक राज्यांत मुसळधार पाऊस, ५० किमी वेगाने वारे वाहणार

Perfume Stains : कपड्यांवर परफ्यूमचे डाग पडलेत? 'या' सोप्या घरगुती उपायांनी करा स्वच्छ, कपडे दिसतील नव्यासारखे!

Maharashtra News Live Update: आम्ही लोकशाही संपू देणार नाही - रामलीला मैदानावरून राहूल गांधी

Nauvari Saree Draping: नऊवारी नेसायला जमत नाही? मग सुंदर मराठमोळ्या लूकसाठी 'या' सोप्या पद्धतीने नेसा नऊवारी

SCROLL FOR NEXT