Team India Won Against England PTI
Sports

WTC Point table : ओव्हल टेस्ट जिंकल्यानंतर भारताची झेप; WTC पॉइंट टेबलमध्येही इंग्लंडला झुकवलं

Latest WTC 2025 points table after India vs England Oval Test : भारतानं ओव्हलच्या मैदानात झालेल्या अटातटीच्या सामन्यात इंग्लंडला लोळवून विजयश्री खेचून आणली. विशेष बाब म्हणजे ओव्हलचं मैदान मारलेल्या भारतानं इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्येही लोळवलं.

Nandkumar Joshi

  • ओव्हलच्या मैदानात टीम इंडियाचा राडा

  • इंग्लंडला अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी केलं पराभूत

  • भारताची WTC पॉइंट्स टेबलमध्ये झेप

  • इंग्लंडची गाडी घसरली

india england oval test wtc 2025 points update : भारतीय संघासाठी इंग्लंड दौऱ्यातील प्रत्येक सामना हा 'कसोटी'चा ठरला. प्रत्येक खेळाडूचा इंग्लंड दौऱ्यात कस लागला. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ अखेरच्या ओव्हल कसोटीत मिळालं आणि विजयाची चव चाखली. भारतीय क्रिकेट संघासाठी हा फक्त विजय नव्हता तर, कठोर मानसिकतेचा हा विजय ठरला. पाचव्या आणि अखेरच्या ओव्हलच्या मैदानावरील रोमहर्षक सामन्यात भारतानं इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. अवघ्या सहा धावांनी सामना जिंकून कसोटी मालिका बरोबरीत सोडवली. ओव्हलच्या मैदानात इंग्लंडला लोळवणाऱ्या भारतीय संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्येही धोबीपछाड दिलाय.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचा शेवट अत्यंत रोमहर्षक झाला. लीड्समध्ये २० जूनपासून ही मालिका सुरू झाली होती, तिचा शेवट ४ ऑगस्टला ओव्हलच्या मैदानात झालेल्या अखेरच्या कसोटीतील शेवटच्या डावात भारतासाठी गोड झाला. टीम इंडियानं अखेरच्या कसोटीत अवघ्या ६ धावांनी विजय नोंदवून ही मालिका बरोबरीत सोडवली. ओव्हल कसोटी निकालाचा परिणाम फक्त मालिकेच्या गुणांवरच नव्हे तर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलवरही दिसून आला. भारतानं विजयासह पॉइंट टेबलमध्येही गरूडझेप घेतली आणि इंग्लंडला मागे टाकलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या फेरीत भारत आणि इंग्लंड हे दोन दिग्गज संघ पहिलीच मालिका खेळत होते. यजमान इंग्लंडनं मालिकेची सुरुवात विजयानं केली. पण एजबेस्टनमध्ये भारतानं जोरदार कमबॅक केलं आणि मालिका बरोबरीत आणली. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडनं रोमहर्षक विजयासह मालिकेत आघाडीत घेतली. भारतानं नंतर वापसी करत मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखली होती. त्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या ओव्हल कसोटीत काय निकाल लागणार याकडं अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं होतं.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण सरस?

मँचेस्टर कसोटीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये इंग्लंड २६ गुण आणि ५४.१७ पॉइंट पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानी होता. तर भारत पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. १६ गुण आणि ३३.३३ पॉइंट पर्सेंटेजसह चौथ्या स्थानी ढकलला गेला होता. पण ओव्हल कसोटी जिंकून भारतानं पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर घडवून आणला. आता भारताचे २८ गुण आणि ४६.६७ पॉइंट पर्सेंटेज झाले असून तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. तर इंग्लंडची चौथ्या स्थानी घसरगुंडी झालीय. इंग्लंडचे २६ गुण आणि ४३.३३ पॉइंट पर्सेंटेज आहेत.

पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया

पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध तिन्ही सामने जिंकले होते. दुसऱ्या स्थानी श्रीलंका आहे. त्यांनी बांगलादेशविरुद्ध एका सामना जिंकला आणि एक अनिर्णित राखला होता. तर सध्याचा चॅम्पियन संघ साऊथ आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी आतापर्यंत या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फेरीतील आपली मोहीम सुरू केली नाही.

मायदेशात भारताला मोठी संधी

भारतीय संघ पुढील कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. दोन महिन्यांनी म्हणजेच २ ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारताचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. ही मालिकाही मायदेशात होणार आहे. या दोन मालिकांमध्ये विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याची मोठी संधी भारताकडे असणार आहे. इंग्लंडचा संघ आता थेट ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात भिडणार आहे. २१ नोव्हेंबरपासून दोन्ही संघ ५ कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT