T20 World Cup Saam tv
Sports

T20 World Cup : क्रिकेटप्रेमींचा नादच खुळा; टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर तरुणांचा एकच जल्लोष, बसच्या छतावरून झेंडे फडवकले, VIDEO

Indian Fans Celebrate Team India's Victory In various part of maharashtra : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर तरुणांनी एकच जल्लोष साजरा केला आहे. बसच्या टपावर बसलेल्या तरुणांनीही झेंडे फडवकले.

Vishal Gangurde

मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. शेवटच्या काही षटकात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. टीम इंडियाने तब्बल १७ वर्षांनी टी२० विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह गगनात मावेनासा झाला आहे.

काही क्रिकेटप्रेमी हॉटेलमध्ये नाचत सुटले आहेत. तर काही तरुणांची टीम थेट रस्त्यावर ढोल-ताशे घेऊन उतरली आहे. तर काही उत्साहाच्या भरात बसच्या छतावरही नाचू लागले आहेत. या सर्व क्रिकेटप्रेमींचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवला. अटीतटीच्या ठरलेल्या या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विश्वचषकावर नाव कोरलं. यानंतर देशासहित महाराष्ट्रातील तरुणांनी रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा केला आहे.

पुण्यातील गुडलक चौकात तरुणांचा जल्लोष

पुण्यातील गुडलक चौकात क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला. गुडलक चौकात क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडत चाहत्यांनी जल्लोष केला. तर पुण्यातील एफसी रोड, जे एम रोड, टिळक रोडवर क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. यावेळी क्रिकेटप्रेमींनी भारत माता की जय घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर पुण्यातील खंडूजी बाबा चौकात क्रिकेट चाहत्यांनी पीएमपीएल बसच्या छतावर चढून जल्लोष केला. बसच्या छतावरील तरुणांनी भारताचे झेंडे फडवून आनंद साजरा केला. पुण्यातील विविध चौक क्रिकेट चाहत्यांनी फुलले.

पुण्यातील अनेक हॉटेलमध्ये आजच्या अंतिम सामन्यांचे स्क्रिनिंग सुरु होते. यावेळी विश्वचषक जिंकताच नागरिकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. सामना जिंकल्यानंतर अनेक जण आनंदांच्या भरात नाचू लागले.

मुंबईकरांनी टी-२० विश्वचषकाच्या विजयानंतर साजरा केला आनंदोत्सव

मुंबईतील विविध भागात अंतिम सामन्याचं स्क्रिनिंग लावण्यात आलं होतं. घाटकोपर पूर्व येथील भाटियावाडी येथेही सामन्याचं स्क्रिनिंग लावलं होतं. या ठिकाणीही क्रिकेटप्रेमींनी विजयानंतर गरबा खेळून आनंद व्यक्त केला. तर दादरमधील शिवाजी पार्कात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरिन ड्राईव्हवर नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये विजयाचा जल्लोष

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर डोंबिवलीमधील फडके रोडवर डोंबिवलीकर क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवत जल्लोष साजरा केला. तर कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो क्रिकेटप्रेमी एकत्र आले. त्यानंतर या क्रिकेटप्रेमींनी नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष केला. तर उल्हासनगरच्या गोल मैदानात क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT