indian hockey team 
Sports

Asian Champions Trophy Hockey 2021 : चक दे इंडिया; पाकला हरवलं

भारत तीन सामन्यांत सात गुणांसह आघाडीवर आहे.

वृत्तसंस्था

ढाका (बांगलादेश) : आशियाई करंडक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत (Asian Champions Trophy Hockey 2021) भारतीय संघाने पाकिस्तानला ३-१ असे नमविले. हरमनप्रीत सिंगने आकाशदीप सिंगने केलेल्या मैदानी गोलच्या दोन्ही बाजूने दोन पेनल्टी कॉर्नर बदलून भारताने (india) त्यांच्या तिसऱ्या राउंड-रॉबिन गटात पाकिस्तानवर (pakistan) विजय मिळविला. खेळाच्या तिसर्‍या सत्रात जुनैदने पाकिस्तान संघाकडून एक गोल नाेंदविला. india vs pakistan hockey news

या सामन्याच्या प्रारंभापासून भारतीय संघातील खेळाडूंमध्ये जाेश हाेता. खेळाडूंनी समन्यवचा खेळ करीत मध्यतंरास पाकिस्तानवर १-० अशी आघाडी घेतली हाेती. यामध्ये हरमनप्रीतची कामगिरी सरस ठरली. सामन्याच्या तिस-या सत्रात आकाशदीपने पाकिस्तानवर आणखी एक गाेल चढविला. परंतु काही वेळातच जूनैद गोल नाेंदवित पाकिस्तान संघाचे खाते उघडले. चाैथ्या सत्रात हरमनप्रीतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. आकाशदीपचे काही फटके लक्षणीय हाेते परंतु त्याचे रुपातांर गुणांमध्ये हाेऊ शकले नाही. शेवटच्या काही मिनिटांत पाकिस्तान संघाने आक्रमणावर भर दिला परंतु हरमनप्रीतने आणखी एक गाेल चढवित पाकिस्तान संघावर दबाव ठेवत भारतीय संघाच्या विजयावर शिकामाेर्तब केला.

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने यापुर्वीच्या सामन्यात यजमान बांगलादेशचा ९-० असा पराभव केला. या सामन्यात दिलप्रीत सिंगने शानदार हॅटट्रिक केली तर जर्मनप्रीत सिंगनेही पेनल्टी कॉर्नरवरुन शानदार गोल केला. ललित उपाध्याय, आकाशदीप सिंग, मनदीप मोर यांनीही विजयात वाटा उचलला. भारताला स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत कोरियाने २-२ अशी बरोबरी साधली होती. भारत तीन सामन्यांत सात गुणांसह आघाडीवर आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने दिली शेवटची मुदतवाढ

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

SCROLL FOR NEXT