india vs australia 
क्रीडा

सलग २६ विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव; चक दे इंडिया!

वृत्तसंस्था

या विजयासह भारताने मालिकेतील व्हाईटवॉश तर टाळलाच, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची सलग २६ एकदिवसीय सामन्यांतील विजयाची मालिकाही खंडीत केली.

मॅकाय : येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम महिला एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाटने ऑस्ट्रेलिया संघाचा दोन गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची २६ एकदिवसीय सामन्यांची विजयी मालिकेस ब्रेक लागला आहे. india-beats-australia-by- two-wickets-to-end-26-match-odi-unbeaten-streak-cricket-sml80

विजयासाठीच्या २६५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटियाच्या पहिल्या अर्धशतकी कामगिरी माेलाची ठरली. झुलन गोस्वामीने Jhulan Goswami विजयी धावा करुन पाठीराख्यांची वाहवा मिळवली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारीत ५० षटकांत नऊ गड्यांच्या माेबदल्यात २६४ धावा केल्या. यामध्ये बेथ मुनीने ६४ चेंडूत ५२ तसेच अशलेग गार्डनरने ६२ चेंडूत ६७ धावा केल्या. भारताच्या झुलन गोस्वामी हिने ३७ धावांत तीन तसेच पूजा वस्त्रकर हे ४६ धावांत तीन गडी बाद केले.

शेफाली वर्माने स्मृती मंधाना समवेत ५९ धावांची कामगिरी बजावली. स्मृतीने २५ चेंडूत २२ धावा केली. स्मृतीने २५ चेंडूत २२ केल्या. त्यानंतर यास्तिका भाटिया आणि शेफाली या जाेडीने उत्तम खेळ करीत ऑस्ट्रेलियाच्या गाेलंदाजांना जेरीस आणले. शेफाली ५६ वर तर यास्तिका ६९ चेंडूत ६४ धावांवर बाद झाली. या दाेघींच्या खेळीने भारतीय संघास लढण्याचे बळ मिळाले. त्यानंतर आलेल्या दीप्ती शर्माने ३० चेंडूत ३१ तसे स्नेह राणाने २५ चेंडूत ३० धावा करीत संघाची विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली.

अंतिम क्षणात राणाला साजेशी कामगिरी करता आली नाही परंतु दूसरीकडे झुलन गोस्वामीने सामन्याच्या शेवटच्या षटकाचे तीन चेंडू बाकी असतानाच चाैकार ठाेकत विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने हा सामना आठ गड्यांच्या माेबदल्यात जिंकला. झुलन गाेस्वामीची कामगिरी सरस ठरल्याने तिला सामनावीर घाेषीत करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ अशी जिंकली

भारतीय महिला संघाने आजचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकला असला तरी मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. टीम इंडियाने तिसरा एकदिवसीय सामना जिंकून पराभवाचा वचपा काढला. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध india vs australia कसोटी आणि टी -२० मालिका देखील खेळणार आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT