Sports

Champions Trophy 2025 : शिक्कामोर्तब! पाकिस्तान, बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, ग्रुप A मधील टॉप 2 संघ ठरले

Bangladesh vs New Zealand : पाकिस्तान, बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेली आहे. तर ग्रुप A मधील टॉप 2 संघ म्हणजे न्यूझीलंड आणि भारत टॉप ठरले आहेत. वाचा सविस्तर

Vishal Gangurde

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलसाठी दोन संघांनी सीट कन्फर्म केली आहे. ग्रुप 'ए' मधील न्यूझीलंड आणि भारताने सोबतच सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. न्यूझीलंडने सोमवारी बांगलादेशविरोधात पाच गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर न्यूझीलंडसोबत भारत देखील पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे.

न्यूझीलंडच्या विजयानंतर बांगलादेश आणि यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेले आहेत. दोन्ही संघांनी सुरुवातीच्या सामन्यात पराभूत झाले होते. बांगलादेशाला न्यूझीलंड व्यतिरिक्त भारताकडूनही ६ विकेटने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानला न्यूझीलंडने ६० धावांनी पराभूत केले. तर भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तानचा गुरुवारी सामना होणार आहे. या सामन्यात जिंकून दोन्ही संघांना काहीच फायदा होणार नाही. न्यूझीलंड आणि भारत त्यांचा शेवटचा लीग सामना दोन मार्च रोजी खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी उतरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण ८ संघ आहेत. त्यातील ग्रुप बीमधील संघांची सेमीफायनलमध्ये जागा निश्चित झालेली नाही. ग्रुप 'बी'मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाने प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अष्टपैलू रचिन रविंद्र चांगलाच चमकला. त्याने रावळपिंडी मैदानात बांगलादेशाविरोधात शतक ठोकलं. न्यूझीलंडला बांगलादेशने विजयासाठी २३७ धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने आव्हानाचा पाठलाग करताना ७२ धावांमध्ये तीन गडी गमावले. विल यंग शून्य धावांवर बाद झाला.

कॉनवे अवघ्या ३० धावांवर बाद झाला. तर केन विलियमसन्सने ५ धावा केल्या. त्यानंतर रचिन रविंद्रने संघाचा डाव सावरला. त्याने १०५ चेंडूत ११२ धावा कुटल्या. त्याने फलंदाजी करताना १२ चौकार आणि १ षटकार लगावला. टॉम लॅथम आणि रचिनने १२९ धावांची भागिदारी रचली. न्यूझीलंडने ४६.१ षटकात बांगलादेशवर विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT