Team India Cricket News/File Photo  SAAM TV
Sports

Team India : टीम इंडियाच्या अडचणी संपेनात, आता ऑलराउंडरलाही दुखापत

आशिया चषक स्पर्धा तोंडावर असताना टीम इंडियातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

Nandkumar Joshi

Cricket News Update | मुंबई: टीम इंडियाच्या अडचणी काही संपेनात! संघातील अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे. टी-२० आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. आधीच यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल जायबंदी असल्यानं स्पर्धेबाहेर आहेत. आता आणखी एक झटका टीम इंडियाला बसला आहे.

इंग्लंडमध्ये वार्विकशायरकडून खेळणारा टीम इंडियातील (Team India) ऑलराउंडर कृणाल पंड्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे किमान तीन आठवडे तरी तो मैदानात नसेल. जायबंदी झाल्यानं तो सोमवारी संध्याकाळी मायदेशात परतला आहे. त्याच्या व्यतिरिक्त उमेश यादव, चेतेश्वर पुजारा याच्यासह अनेक खेळाडू तेथे वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत.

कृणाल पंड्याला (Krunal Pandya) १७ ऑगस्ट रोजी नॉटिंघमशायरविरुद्ध वार्विकशायरकडून खेळताना दुखापत झाली होती. त्याने या सामन्यात ३७ धावा केल्या होत्या. मैदानाबाहेर गेलेला कृणाल पुन्हा मैदानात गोलंदाजीसाठी उतरलाच नाही. मिलिडसेक्स आणि डरहमविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांत तो खेळू शकला नाही. डॉक्टरांनी त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला.

३१ वर्षीय कृणाल पंड्या या मोसमात वार्विकशायरकडून ५ लिस्ट ए सामने खेळला. त्याने ३४ च्या सरासरीने १३४ धावा केल्या. सरेविरुद्ध त्याने ८२ चेंडूंमध्ये ७४ धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच गोलंदाजीत २५ च्या सरासरीने ९ विकेटही घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT