India-Afaganistan Plyaing XI Saam Digital
Sports

India-Afaganistan Plyaing XI: दुसऱ्या सामन्यात विराटसह या खेळाडूंचं कमबॅक, टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल

India vs Afghanistan T20I Series: भारत अफगाणिस्तान ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने मोहालीत झालेला सामना ६ गडी राखून जिंकला होता. या विजयामुळे संघाने मालिकेतील १-० अशी आघाडी मिळवली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दुसरा सामना आज होत असून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.

Sandeep Gawade

भारत अफगाणिस्तान ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने मोहालीत झालेला सामना ६ गडी राखून जिंकला होता. या विजयामुळे संघाने मालिकेतील १-० अशी आघाडी मिळवली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दुसरा सामना आज होत असून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान विराट कोहली १४ महिन्यांनंतर T20 मध्ये पुनरागमन करत आहे. मोहालिच्या सामन्यात खेळला नव्हता त्यामुळे या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मावर असतील. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता.

मागच्या सामन्यात खातेही न खोलता आलेल्या रोहितवरही या सामन्यात चांगली खेळी करण्याचं दडपण असेल. विराटचं संघात पुनरागमन झाल्यामुळे या सामन्यासाठी संघातही बदल पाहायला मिळू शकतात. विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून रोहित शर्मा या सामन्यातही नवीन प्रयोग करताना दिसत आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरु शकतो. यात वेगवान गोलंदाज आवेश खानला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत अफगाणिस्तान प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयसवाल/शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह , मुकेश कुमार/आवेश खान.

अफगाणिस्तान: रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई/रहमत शाह, इब्राहिम जादरान (कॅप्टन), अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, गुलबदीन नायब, मुजिब उर रहमान, नवीन-उल- हक, फजलहक फारूकी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

SCROLL FOR NEXT