rishabh Pant  Saam tv
Sports

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

india vs south africa cricket match : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. या सीरीजसाठी ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

Vishal Gangurde

ऋषभ पंत दुखापतीनंतर प्रथमच मैदानात उतरणार

ऋषभ पंत भारत अ संघाचं कर्णधारपद सांभाळणार

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध दोन ४ दिवसांचे सामने

पहिला सामना ३० ऑक्टोबर आणि दुसरा सामना ६ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या ४ दिवसांच्या सीरीजसाठी टीम इंडियाच्या अ संघाची घोषणा करण्यात आलीये. दोन्ही सामने बेंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवण्यात येणार आहे. या सीरीजचा पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी सुरु होईल. तर सीरीजचा दुसरा सामना हा ६ नोव्हेंबर रोजी असेल.

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध सीरीजमध्ये ऋषभ पंतने पुनरागमन केलं आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंत दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर संघाच्या बाहेर गेला होता. आता ऋषभ पंतला भारताच्या अ संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.तर बी. साई सुदर्शन हा उपकर्णधार असेल.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंत दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियाच्या संघातून बाहेर पडावं लागलं होतं. त्याच्या पायाच्या बोटाला ख्रिस वोक्सचा यॉर्कर लागला होता. या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे भारत आणि इंग्लंड सीरीजमधील सामना त्याला खेळता आला नाही. भारत-इंग्लंडदरम्यानची ही सीरीज २-२ अशी बरोबरीत सुटली होती.

दुखापतीमुळे पंतला वेस्ट इंडिदविरुद्ध टेस्ट सीरीजलाही मुकावं लागलं होतं. त्याच्या जागी संघात ध्रुव जुरेल आणि नारायण जगदीसन या दोघांचा समावेश करण्यात आला होता. या सीरीजमधील दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले होते. आता दक्षिण आफ्रिकेचा अ संघ नोव्हेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर येत आहे.

पहिल्या सामन्यासाठी भारत अ संघ - ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीशन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उप-कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, अंशुल कांबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी, सारांश जैन, तनुष कोटियन, मानव सूथार

दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघ : ऋषभ पंत ( कर्णधार, यष्टीरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, गुरनूर बरार, अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, ऋतुराज गायकवाड, तनुष कोटियन, मानव सूथार, खलील अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT