indian women cricketer twitter
Sports

IND W vs SCO W: तृषाचे विक्रमी शतक; स्कॉटलँडला लोळवत टीम इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश

India Womens vs Scotland Womens: भारतीय संघाने आयसीसी महिला अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत स्कॉटलँडला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

अंडर १९ महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी सुरुच आहे. भारताचा सामना स्कॉटलंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा डाव अवघ्या ५८ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून खेळताना तृषाने शानदार खेळी केली. तृषाने रेकॉर्डब्रेकिंग शतकी खेळी केली. तर कमलिनीने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली.

भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाने २० षटकअखेर २०८ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून खेळताना युवा फलंदाज तृषाने ५९ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी केली.

एका बाजूने तृषा तुफान फटकेबाजी करत होती. तर दुसऱ्या बाजूने कमलिनीने तिला साथ देत ५१ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान तिने ९ चौकार मारले. तर शेवटी सनिका चालकेने नाबाद २९ धावांची खेळी केली.

स्कॉटलँडचा डाव कोसळला

भारतीय संघाने दिलेल्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलँडच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. स्कॉटलँडकडून फलंदाजी करताना पीपा केलेने सलामीला फलंदाजी करताना अवघ्या १२ धावांची खेळी केली.

त्यानंतर इम्मा देखील १२ धावा करत माघारी परतली. स्कॉटलँडच्या एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान स्कॉटलँडला हा सामना गमवावा लागला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

भारतीय गोलंदाजांची कमाल

फलंदाजांनी कमाल कामगिरी केल्यानंतर गोलंदाजही चमकले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आयुषीने ३ षटकात ८ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर वैष्णवीने २ षटकात ५ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर फलंदाजीत शतकी खेळी करणाऱ्या तृषाने गोलंदाजीत २ षटकात ६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT