harmanpreet kaur twitter
Sports

Harmanpreet Kaur: टीम इंडियाच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर भडकली! सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Harmanpreet Kaur On Team India Defeat: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाली हरमनप्रीत कौर? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Harmanpreet Kaur Statement: आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला.

सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता. मात्र या महत्वाच्या सामन्यातच भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर एकटी लढली. मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ' त्यांच्याकडे काहीच फिक्स नसतं. ते एक प्लान बनवू शकतात. ते एक किंवा दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून नाहीत. त्यांच्याकडे बरेच अष्टपैलू खेळाडू आहेत आणि सर्वच योगदान देतात. '

' मला तरी हेच वाटतं की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकच फरक आहे. त्यांनी सोप्या धावा करु दिल्या नाहीत. त्यांना वर्ल्डकप खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. हीच एक गोष्ट आहे जी दाखवून देते की, तो मोठा संघ आहे.' असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

तसेच ती पुढे म्हणाली की, ' मला तरी वाटतं की, आम्ही चांगला खेळ केला. आम्हाला हे माहीत होतं की, हे कठीण असणार आहे. मला वाटतं, आम्ही शेवटपर्यंत सामन्यात टिकून होतो, मात्र जसं की तुम्हाला माहितीये, त्यांचा अनुभव. त्यांना सामना कसा जिंकायचा हे माहीत आहे. आम्हाला त्यांच्याकडून हेच शिकायचं आहे.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला १४२ धावा करता आल्या. भारताकडून फलंदाजी करताना हरमनप्रीत कौरने नाबाद ५४ धावांची खेळी केली. मात्र भारतीय संघाला हा सामना ९ धावांनी गमवावा लागला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT