HARMANPREET KAUR TWITTER
Sports

IND W vs AUS W: हरमनप्रीत एकटी लढली! सामना निसटला, मात्र अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी; पाहा समीकरण

ICC Womens T20 World Cup 2024, IND W vs AUS W: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी कायम आहे.

Ankush Dhavre

India w vs Australia w Highlights: भारतीय महिला संघाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी पूर्ण जोर लावला.

भारताकडून हरमनप्रीत कौरने अर्धशतकी खेळी केली. ती शेवटच्या चेंडूपर्यंत टीकून राहिली. मात्र संघाचा विजय आणि सेमीफायनमध्ये जाण्याचं तिकीट अवघ्या ९ धावांनी हुकलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील सेमीफायनचं तिकीट पक्क केलंय.

भारतीय संघाला अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी?

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पराभवचा सामना करावा लागला असला, तरीदेखील भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याच मार्ग मोकळा आहे. हा सामना भारतीय संघाने १८ पेक्षा कमी धावांनी गमावला आहे. त्यामुळे जर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं, तर भारतीय संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या शेफाली वर्माने २० धावा केल्या. तर महत्वाच्या सामन्यात स्म्रिती मंधाना अवघ्या ६ धावांवर माघारी परतली.

जेमीमा रॉड्रिग्ज १६ धावा करत माघारी परतली. दिप्ती शर्माने २५ चेंडूंचा सामना करत २९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शेवटी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर एकटी लढली. तिने संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण जोर लावला. तिने अर्धशतकी खेळी केली. मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

ऑस्ट्रेलियाने दिलं १५२ धावांचं आव्हान

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १५१ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या ग्रेस हॅरिसने ४० धावांची खेळी केली. वेअरहॅम शून्यावर माघारी परतली. तर बेथ मुनी २ धावांवर माघारी परतली. मॅकग्राने ३२ आणि एलिस पेरीनेही ३२ धावांची खेळी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT