team india twitter
Sports

IND vs ZIM 3rd T20I: गोलंदाजांची चांदी होणार की फलंदाज धावांचा पाऊस पाडणार? तिसऱ्या सामन्यात कसं असेल हवामान?

India vs Zimbabwe, Weather Update: भारत आणि झिम्बाव्बे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. हरारेच्या मैदानावर सुरु असलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. दरम्यान तिसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला १०० धावा करताना नाकी नऊ आले होते. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांवर हल्लाबोल करत २३४ धावांचा डोंगर उभारला.

हरारेच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर आतापर्यंत ४३ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान २५ सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करताना १८ संघांनी बाजी मारली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करुन सामना जिंकणाऱ्या संघांची सरासरी अधिक आहे. त्यामुळे हरारेच्या मैदानावर सामना जिंकायचा असेल, तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणं हा योग्य निर्णय ठरु शकतो.

हा सामना स्थानिक वेळेनुसार,दुपारी १ वाजता सुरु होणार आहे. Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, तापमान २६ डिग्री सेल्सिअस इतकं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाऊस पडणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, रियान पराग, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या रस्त्यांवरून सरकारवर निशाणा; उद्योगांबाबतही गंभीर सवाल

Shiv Sena SC Case Live : आजची सुनावणी संपली, कोर्टानं दिली पुढची तारीख, वाचा युक्तिवादाचा शब्द ना शब्द

Cockroach : झुरळांमुळं हैराण झालात? घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

Light Bill hike : महावितरणचा शॉक! तुम्हाला वीज बिल जास्त येणार, किती युनिटला किती दरवाढ? जाणून घ्या

महायुतीत पुन्हा वाद? MMRDAच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची दांडी; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT