India vs West Indies T20I Series Squad saam tv
क्रीडा

IND vs WI T20I Series Team: टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा! या २ आक्रमक खेळाडूंना मिळाले संघात स्थान

West Indies Squad For T20I Series: ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies T20I Series Squad:

सध्या भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम सामना १ आज (१ ऑगस्ट) त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे.

ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डने १५ सदस्यांची यादी जाहिर केली आहे.

टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा..

आगामी टी-२० मालिकेसाठी वेस्टइंडीज संघात यष्टीरक्षक फलंदाज शाई होप आणि वेगवान गोलंदाज ओशेन थॉमसला कमबॅक करण्याची संधी देण्यात आले आहे. भारतीय संघाविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत शाई होप हा वेस्टइंडीज संघाचे प्रतिनिधित्व नेतृत्व करतोय.

तो गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपला शेवटचा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर ओशेन थॉमस डिसेंबर २०२१ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद रोमेन पॉवेलकडे सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी काइल मेयर्सला सोपवण्यात आली आहे. (Latest sports updates)

टी-२० मालिकेसाठी असा आहे वेस्टइंडीजचा संघ :

रोमेन पॉवेल (कर्णधार), काइल मायर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज़, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅकॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.

टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

ईशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varora Vidhan Sabha : वरोरा विधानसभा क्षेत्रात बंडखोरांचे आव्हान; बहुरंगी लढतीने राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra News Live Updates: महायुतीच्या नेत्यांच्या अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा

Mental Health : आयुष्यातील चढ-उतारांमुळे मानसिक आरोग्य बिघडलंय? 'हा' रामबाण उपाय करा कायम मूड राहील फ्रेश

Diabetic Patients: मधुमेही रुग्ण इडली खाऊ शकतात की नाही?

Mallikarjun Kharge : त्यांनी आमच्याच योजना कॉपी केल्यात, मल्लिकार्जुन खरगेंचा महायुतीवर आरोप

SCROLL FOR NEXT