वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  saam TV
Sports

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

Rohit Sharma Virat Kohli included in India ODI squad : आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. तर ऑलराउंडर रवींद्र जडेजाचंही संघात पुनरागमन झालंय.

Nandkumar Joshi

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत क्रिकेट विश्वात वावड्या उठल्या असतानाच, वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. अजित आगरकरच्या नेतृत्वात निवड समितीनं बुधवारी संघ जाहीर केला. भारताच्या वनडे संघात स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याचंही पुनरागमन झालं आहे. आकिब नबी आणि नमन धीर या दोघांना पहिल्यांदाच वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, ऋषभ पंतला संधी मिळू शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी ईरानी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया चमूचीही घोषणा करण्यात आली आहे. त्याचं नेतृत्व पंतकडे देण्यात आले आहे.

भारतीय वनडे संघ

शुभमन गिल - कर्णधार, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल - उपकर्णधार, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर.

भारतीय टी २० संघ -

श्रेयस अय्यर - कर्णधार, तिलक वर्मा - उपकर्णधार, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.

रेस्ट ऑफ इंडिया -

ऋषभ पंत- कर्णधार, सनत सांगवान, शिखर मोहन, सुदीप घरामी, सरफराज खान, स्मरण रविचंद्रन, मानव सुथार, सारांश जैन, आकाश दीप, मुकेश कुमार, मुकेश चौधरी, आर्यन जुयाल, आर्यन पांडे, अनुकूल रॉय, आयुष दोसेजा.

वनडे मालिकेचे वेळापत्रक

पहिला वनडे सामना हा २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सुरू होईल. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल. तर दुसरा वनडे सामना ३० सप्टेंबरला दुपारी २ वाजता गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. तिसरा वनडे सामना हा मुल्लांपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT