ind vs wi 5th t20i twitter
क्रीडा

IND vs WI 5th T20i Highlights: वर्ल्डकपलाही पात्र न ठरलेल्या विंडीजकडून टीम इंडियाचा पराभव; ३-२ ने गमावली टी-२० मालिका

India vs West Indies 5th T20I: वेस्टइंडीजने ही मालिका ३-२ ने खिशात घातली आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 5th T20 Match Result: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना फ्लोरिडाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वेस्टइंडीज संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकला आहे. यासह वेस्टइंडीजने ही मालिका ३-२ ने खिशात घातली आहे.

वेस्टइंडीज संघाने या मालिकेला चांगली सुरुवात केली होती. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील पुढील २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला होता. मात्र अंतिम सामना भारतीय संघाला गमवावा लागला आहे. या सामन्यासह भारतीय संघाने मालिका देखील गमावली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संघातील सलामीवीर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. यशस्वी जयस्वाल ५ तर शुबमन गिलने ९ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ६१ धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तर तिलक वर्माने २७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ९ गडी बाद १६५ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

या धावांचा पाठलाग करताना ब्रेंडन किंगने ५५ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८५ धावांची खेळी केली. तर निकोलस पुरनने ४७ धावांचे योगदान दिले. शेवटी शाई होपने नाबाद २२ धावांचे योगदान देत वेस्टइंडीजला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT