IND vs WI 2nd odi playing 11 Saam TV
Sports

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

IND vs WI दुसऱ्या वनडेत भारताने प्लेईंग 11 मध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. नितीशकुमार रेड्डीला विश्रांती देण्यात आली असून अकीब नबीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. मोहम्मद सिराजला पुन्हा स्थान मिळाले नाही.

Namdeo Kumbhar

IND vs WI 2nd odi playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या वनडेत भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू नितीशकुमार रेड्डी याला प्लेईंग ११ मधून आराम देण्यात आला आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिरकीची धुरा असेल. तर नमन धीर फिनिशर आणि सहाव्या गोलंदाजाच्या भूमिकेत असेल. भारतीय संघाने आजही प्लेईंग ११ मध्ये मोहम्मद सिराज याच्यावर विश्वास दाखवला नाही. सिराजला बाकावरच बसावे लागणार आहे.

तिसरा वेगवान गोलंदाज कोण?

गुवाहाटीमधील बरसापारा स्टेडियमवर भारतीय संघ ३ वेगनान गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्या जोडीला आता जम्मू काश्मीर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अकीब नबी याला स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा आणि नमन धीर हे फिरकी गोलंदाजीची धुरा संभाळतील.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या वनडेसाठी भारतीय प्लेईंग ११ कशी असेल?

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रविंद्र जडेजा, अकीब नबी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा

वेस्ट इंडिजची प्लेईंग ११

जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), अमीर जांगू, शेर्फेन रदरफोर्ड, रॉस्टन चेस, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडन सील्स, विटेल लॉज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आयोगाची निष्पक्षता संपली, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा- खरगे

Blood Group and Diabetes: A, B, AB की O? कोणत्या ब्लड ग्रुपला डायबिटीजचा सर्वाधिक धोका?

Thane News: ठाकरेसेनेच्या नेत्याच्या हत्येमागे माजी महापौर शिंदेंचा हात?, ठाण्यात राजकारण तापले

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

Cancer : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT