IND vs SL: 9 खेळाडू बाहेर पडल्यानंतर फलंदाज आणायचे कुठून? भारतीय संघ चिंतेत Twitter/ @BCCI
Sports

IND vs SL: 9 खेळाडू बाहेर पडल्यानंतर फलंदाज आणायचे कुठून? भारतीय संघ चिंतेत

श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघ टी -20 (IND vs SL) मालिका खेळत आहे. परंतू आता भारतीय संघासमोर (Team India) अडचणी वाढल्या आहेत.

वृत्तसंस्था

श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघ टी -20 (IND vs SL) मालिका खेळत आहे. परंतू आता भारतीय संघासमोर (Team India) अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, क्रुणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडू या मालिकेतून बाहेर पडले आहेत. श्रीलंका आणि भारत यांच्यात आता 2 टी -20 सामने होणार आहे. अशा परिस्थितीत प्लेईंग 11 निवडण्यासाठी भारतीय संघासमोर एक मोठी समस्या उद्भवली आहे.

भारतीय संघ 22 खेळाडूंसह टी -20 मालिकेसाठी उतरला होता. त्यापैकी 9 खेळाडू आधीच बाहेर पडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रुणाल पंड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पांड्या, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन, सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि कृष्णाप्पा गौतम हे खेळाडू आहेत. उर्वरित खेळाडूंची नावं समोर यायला वेळ लागणार आहे .

जर हे बाहेर गेलेले खेळाडू काढले गेले तर संघात फक्त 13 खेळाडू बाकी असतील. यातील कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास ती भारतूय संघासाठी धोक्याची घंटा असेल. ज्या खेळाडूंची ओळख पटली आहे त्यात 3 अष्टपैलू आणि 4 फलंदाजांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत उर्वरित 15 खेळाडूंपैकी केवळ 5 फलंदाज बाकी आहेत. उर्वरित दोन खेळाडू किंवा त्यापैकी एखादा खेळाडू बाहेर पडल्यास भारतीय संघासाठी अडचणी वाढणार आहेत. जर तसे झाले तर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भारतीय संघ 3 किंवा 4 फलंदाजांना घेऊन मैदानात खेळेल?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, दुसर्‍या सामन्यापूर्वी मंगळवारी सकाळी सर्व खेळाडूंची अँन्टीजेन चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये क्रुणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर, सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 8 खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर या खेळाडूंना विलगीकरणातस ठेऊन मालिकेतून बाहेर काढण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT