team india X /Social Media
Sports

IND vs SL: टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर लंकेची उडाली दाणादाण, श्रीलंकेच्या अर्ध्या संघाला १४ धावांत तंबूत धाडलं

IND vs SL World Cup: टीम इंडियाने अवघ्या १४ धावांत श्रीलंकेच्या ६ फलदाजांना तंबूत धाडलं आहे.

Vishal Gangurde

India vs Sri Lanka Latest News:

विश्वचषक स्पर्धेत ३३ वा सामना भारत विरुद्ध श्रीलंकेविरुद्ध सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनी लंकेची दाणादाण उडवली आहे. टीम इंडियाने अवघ्या १४ धावांत श्रीलंकेच्या ६ फलदाजांना तंबूत धाडलं आहे. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर लंकेच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे. (Latest Marathi News)

भारताने श्रीलंकेला ३५८ धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची चांगलीच पडझड झाली. श्रीलंकेचे ६ फलंदाज अवघ्या ६ धावांवर बाद झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्या चेंडूत पथुम निसांकाला तंबूत धाडलं. बुमराहने पथुम निसांकाला पायचीत केले. त्यानंतर सिराजने दुसऱ्या षटकात दिमुथ करुणारत्नेला बाद केले. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूत सदीरा समरविक्रमाला तंबूत धाडलं.

मोहम्मद शमीने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूत कर्णधार कुसल मेंडिसची दांडी गुल केली. त्यानंतर शमीने दहाव्या षटकात पुन्हा मोठा झटका दिला. शमीने दहाव्या षटकात चरिथ असंलका आणि दुशान हेमंथाला बाद केले.

दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानतंर १२ व्या षटकात शमीने दुष्मंथाला तंबूत धाडलं. शमीच्या भेदक माऱ्यापुढे मॅथ्यूजही गारद झाला. मॅथ्यूज अवघ्या २५ धावांवर बाद झाला. श्रीलंकेचे १४ षटकात २९ धावांवर ८ गडी बाद झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT