IND vs SL  Twitter/ @OfficialSLC
क्रीडा

IND vs SL Playing 11: आज रंगणार पहिला सामना; धवनच्या नेतृत्वाकडे लक्ष

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघावर सर्वांची नजर असेल कारण संघ विराट कोहली,(Virat Kohli) रोहीत शर्मा,(Rohit Sharma) केएल राहूल, जसप्रित बुमराह यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) या संघाचे नेतृत्व करणार आहे. आज तो प्रथमच टीम इंडियाचा कर्णधार म्हणून काम पाहिल. संघातील 20 पैकी 10 खेळाडू अनकॅप्ड आहेत, त्याचबरोबर बरेच खेळाडू पदार्पण करीत आहेत. यामध्ये देवदत पडिक्कल, ऋतूराज गायकवाड, संजू सॅमसन आणि चेतन साकारिया यांचा समावेश आहे.

श्रीलंकेच्या संघाबद्दल बोलताना दासुन शनाकाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. बऱ्याच अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघाची अवस्था अत्यंत वाईट दिसत आहे. अँजेलो मॅथ्यूजने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कुसल परेरा आणि बिनुरा फर्नांडो दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. इंग्लंडमध्ये बायो बबलचे उल्लंघन केल्याबद्दल काही खेळाडूंवर बंदी घातली आहे.

भारत आणि श्रीलंका वनडे मध्ये हेड टू हेड

भारत आणि श्रीलंका यांनी आतापर्यंत 159 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताचं पारडं यामध्ये जड आहे. संघाने 91 सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने आतापर्यंत फक्त 56 विजय मिळवले आहेत. 11 सामने निकालाविना समाप्त झाले आहेत, तर एक सामना टाय झाला आहे.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टिरक्षक), मनिष पांडे, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दिपक चहर, युजवेंद्रसिंग चहल, कुलदिप यादव.

श्रीलंका संघ

दासुन शनाका (कर्णधार), मिनोद भानुका, भानुका राजपक्षे, धनंजय डिसिलवा (उप-कर्णधार), चरित अस्लंका, वनिंदू हसरंगा, चमिका करुणरत्ने, इसरु उडाना, दुशमंता चमिरा, लक्षण संदाकन.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT