IND vs SL Asia Cup Saam Tv
Sports

IND vs SL Asia Cup|पंतला मिळणार का डच्चू; कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

आशिया चषकात टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात स्पर्धेतील पहिला पराभव झाला.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया चषकात टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात स्पर्धेतील पहिला पराभव झाला. टूर्नामेंटच्या सुपर-4 च्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. याआधी ग्रुप फेरीत भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. आता मंगळवारी टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंकेचा सामना होणार आहे. हा सामना जिंकणे टीमसाठी आवश्यक आहे. आता या सामन्यावर स्पर्धेतील टीमचे पुढचे भवितव्य ठरणार आहे. हा सामना जिंकला तर टीमला अंतिम फेरीत स्थान मिळण्याची शक्यता कायम राहील तर पराभवामुळे टीमला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे हा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.

सुपर 4 टप्प्यातील त्यांच्या पहिल्या सामन्यात, भारत पाकिस्तानकडून (Pakistan) पराभूत झाला, तर त्यांचे पुढचे प्रतिस्पर्धी श्रीलंका अफगाणिस्तानवर चार विकेट्सने विजय मिळवळा. मंगळवारचा सामना श्रीलंकेसाठीही महत्वाचा आहे. तसेच त्यांचा सुपर 4 मधील शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो दिसला नाही. या सामन्यात टीम इंडियाला रवींद्र जडेजाची कमतरता असली तरी, पाच विकेट पडल्यानंतर, दीपक हुडा आणि कोहली यांच्यानंतर फलंदाजीशिवाय टीमकडे पर्याय नव्हता. त्यामुळे आता पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीममध्ये आणखी बदल होऊ शकतात. पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांमधील संघात कोणाला स्थान मिळणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडाचा संघात समावेश होता, पण त्याला एकही षटक देण्यात आले नव्हते.आता ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला संघात स्थान मिळणार हाही मोठा प्रश्न आहे. दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल या दोघांचाही संघात समावेश होऊ शकतो.

आजचा सामना टीम इंडियासाठी (Team India) महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा भारतीय प्लेइंग इलेव्हनवर आहेत.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

- रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT