INS vs SL Saam TV
Sports

IND vs SL 2nd T20 : 'ते' ७ चेंडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत; श्रीलंकेचा २०१६ नंतर पहिल्यांदाच भारतभूमीत विजय

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच पराभव आहे.

साम टिव्ही ब्युरो

IND vs SL 2nd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका (Srilanka)  संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला आठ विकेट्स गमावून केवळ १९० धावा करता आल्या.

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका आणि कुशल मेंडिस यांनी श्रीलंकेसाठी निर्णायक फलंदाजी केली. त्याचवेळी अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतासाठी चांगली कामगिरी केली. मात्र, हे दोघेही भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ७ जानेवारीला खेळवला जाणार आहे. (Indian Cricket Team)

भारताला अतिरिक्त धावांचा फटका

अर्शदीप सिंग, शिवम वामी आणि उमरान मलिक यांनी टाकलेल्या एकूण ७ नो बॉलवरील फ्री हिटवर जवळपास ३४ धावा अतिरिक्त मिळाल्या. याचाच अर्थ श्रीलंकेला एक षटक अधिकचं खेळण्यास मिळालं. याचाच फटका टीम इंडियाला बसल्याचं दिसून आलं.

भारताचा डाव

राहुल त्रिपाठी पदार्पणाच्या सामन्यात पाच धावांवर बाद झाला. टीम इंडियाच्या २१ धावांत तीन विकेट पडल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला. कर्णधार हार्दिकही १२ धावा करून बाद झाला. भारताच्या चार विकेट ३४ धावांवर पडल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनी छोटीशी भागीदारी केली, पण हुडाही नऊ धावांवर बाद झाला. यानंतर अक्षर पटेलसह सूर्यकुमारने वेगवान धावा केल्या.

अक्षर आणि सूर्याने मिळून भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. या दोघांनी शानदार भागीदारी करून भारताला सामन्यात पुन्हा आणले. पण शेवटी सूर्यकुमार ५१ धावांवर आणि अक्षर ६५ धावा करुन बाद झाला. दोघे बाद झाल्याने भारताचा सामना गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT