Rohit Sharma Viral Video
Sports

Viral Video: मैदानात रडणाऱ्या छोट्या फॅनकडे पोहोचला रोहित, त्यानंतर पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही रोहितचे फॅन व्हाल!

स्टेडियममध्ये रडत असलेल्या एका छोट्या फॅनला शांत करताना रोहित दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rohit Sharma Video Viral: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघामधील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माही श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतून फीट होऊन संघात परतला आहे.

सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये रडत असलेल्या एका छोट्या फॅनला शांत करताना रोहित दिसत आहे.

प्रॅक्टिस सेशन दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. प्रॅक्टिसदरम्यान काही फॅन्सला रोहित शर्माला भेटून त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. मात्र रोहितला प्रत्येक फॅनसोबत सेल्फी घेणे शक्य नाही. मात्र तेथे उपस्थित एक छोटा फॅन रडताना रोहितला दिसला.

त्यावेळी रोहित स्वत: त्याच्याकडे पोहोचला. रोहित त्या रडणाऱ्या मुलाला शांत करताना दिसला. रोहित त्या मुलाचे गाल प्रेमाने ओढतानाही दिसत आहे. यावेळी रोहितने त्या मुलाची काय रडतोयस अशी विचारपूसही केली. तसेच त्याचे गाल ओढून त्याचं कौतुकही केलं.

यानंतर रोहितचा छोटा फॅन शांत झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू देखील फुललं. रोहितने त्यानतंर त्याच्यासोबत सेल्फी देखील घेताना. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.टीम इंडियाच्या स्टार प्लेअर त्याच्या चाहत्यांसोबत किती प्रेमाने वागतोय याबाबत रोहितचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT