AXAR PATEL twitter
क्रीडा

Axar Patel Runout: कशी नशिबाने थट्टा मांडली! हार्दिकमुळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने पडली अक्षरची विकेट - VIDEO

India vs South Africa 2nd T20I: अक्षर पटेलला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र हार्दिक पंड्यामुळे अक्षर पटेलला बाद होऊन माघारी परतावं लागलं.

Ankush Dhavre

IND vs SA 2Nd T20I: दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले.

सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर शेवटी अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. त्यामुळे त्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

या सामन्यात अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ज्यावेळी तो फलंदाजीला आला त्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता. अवघ्या ४५ धावांवर भारताचे ४ फलंदाज तंबूत होते. त्यामुळे भारतीय संघाला भागीदारीची गरज होती. अक्षरने हार्दिकसोबत मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. ही भागीदारी पुढे जात होते. मात्र नशीब खराब असल्यामुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना दक्षिण आफ्रिकेकडून १२ वे षटक टाकण्यासाठी पीटर गोलंदाजीला आला. त्यावेळी हार्दिक पंड्या स्ट्राईकवर होता. हार्दिकने सरळ शॉट मारला. त्यावेळी अक्षर पटेल क्रिझच्या बाहेर आला होता. त्यामुळे चेंडू पीटरच्या हाताला लागून यष्टीला जाऊन धडकला. त्यामुळे त्याला बाद घोषित केलं.

भारतीय संघाने केल्या १२४ धावा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन ०, अभिषेक शर्मा ४, सूर्यकुमार ४, तिलक वर्मा २० , अक्षर पटेल २७ धावा करत माघारी परतला. तर हार्दिक पंड्या ३९ धावांवर नाबाद परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT