team india  google
Sports

Ind vs Sa, Playing XI Prediction: पहिल्या कसोटीसाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग 11; प्रमुख गोलंदाजाला ठेवलं बाहेर

Sunil Gavaskar Playing 11 Prediction For IND vs SA 1st Test: या पहिल्या कसोटीसाठी भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी प्लेइंग ११ ची निवड केली आहे.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar Playing 11 Prediction For IND vs SA 1st Test:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गज खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

मुख्य बाब म्हणजे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे ही मालिका जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान या पहिल्या कसोटीसाठी भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी प्लेइंग ११ ची निवड केली आहे. (Team India Playing 11 Prediction)

हा सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. मात्र संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्याने मालिकेतून बाहेर झाला आहे. शमी संघात नसला तरी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहची जोडी प्लेइंग ११ मध्ये खेळताना दिसेल. या दोघांना साथ देण्यासाठी मुकेश कुमार किंवा प्रसिद्ध कृष्णापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. (India vs South Africa 1st Test)

या सामन्यासाठी भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी प्लेइंग ११ निवडली आहे. सुनील गावसकरांनी आपल्या प्लेइंग ११ मध्ये मुकेश कुमारला स्थान दिलं आहे. वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असणाऱ्या खेळपट्टीवर सुनील गावसकर यांनी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. (Latest sports updates)

सुनील गावसकर यांनी आपल्या प्लेइंग ११ मध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची निवड केली आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून केएक राहुलला संघात स्थान दिलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीची निवड केली आहे. पाचव्या क्रमांकावर केएल राहुल, सहाव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आणि आठव्या क्रमांकावर आर अश्विन असेल. तर बुमराह, सिराज आणि मुकेश कुमार हे गोलंदाज असतील.

अशी आहे सुनील गावसकर यांनी निवडलेली प्लेइंग ११:

रोहित शर्मा, यशस्‍वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्‍मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT