team india saam tv
Sports

IND vs SA 3rd T20I: पराभवानंतर टीम इंडियाची Playing XI बदलणार; या 2 बदलांसह उतरणार मैदानात

Team India Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतात.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना १३ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल, तर मालिकेतील तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे.

सलामी जोडी बदलणार?

या मालिकेसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीला क डावाची सुरुवात करताना दिसून आले होते. संजूने पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर माघारी परतला.

तर दुसरीकडे अभिषेक शर्मा दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. पहिल्या सामन्यात तो ४ धावांवर माघारी परतला. तर दुसऱ्या सामन्यात त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या. ही जोडी फ्लॉप ठरली असली तरीदेखील या तिसऱ्या सामन्यासाठी सलामी जोडीत कुठलाही बदल केला जाणार नाही. तर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

मध्यक्रमात बदल होणार?

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर, भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही. फलंदाजांनी एकापाठोपाठ एक रांग लावली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. तिसऱ्या सामन्यासाठी रमनदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंगला संधी दिली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत रमनदीपने शानदार अष्टपैलू कामगिरी केली.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी

गेल्या सामन्यात धावांचा बचाव करताना आवेश खान महागडा ठरला होता. त्यामुळे त्याला या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी विजय कुमार वैशाकला संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रमनदीप सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, विजय कुमार वैशाक, अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

SCROLL FOR NEXT