virat kohli with axar patel twitter
Sports

IND vs SA, 1st Innings: बार्बाडोसमध्ये विराट- अक्षरची बॅट तळपली! दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी मोठं आव्हान

India vs South Africa, T20 World Cup 2024: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही सामन्यांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि क्षणही न दवडता फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विराट कोहली आणि अक्षर पटेलने सार्थ ठरवला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात १७६ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावांची गरद आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा ९ तर रिषभ पंत शून्यावर माघारी परतला. त्यानंतर सूर्या ३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सांभाळला. अक्षर पटेलने ४७ आणि विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. शेवटी शिवम दुबेने२७ आणि हार्दिक पंड्याने ५ धावा केल्या.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT