IND VS SA T20 Match Snake Enter in Ground Snake viral video  Saam TV
Sports

IND Vs SA T20 : बाप रे बाप, मैदानात घुसला भलामोठा साप; KL राहुलचं लक्ष गेलं अन्...

मैदानावर अचानक साप आल्याचं पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर सापाला पकडताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

Satish Daud

IND Vs SA T20 : आजवर तुम्ही तांत्रिक अडचणींमुळे, प्रेक्षक मैदानात घुसल्याने तसेच कुत्र्याने मैदानात एंट्री केल्याने क्रिकेटचा (Cricket) सामना थांबवण्यात आल्याच्या घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण, कधी साप (Snake) मैदानात घुसल्याची घटना तुम्ही ऐकलीये का? नाही ना... भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान अचानक मैदानात साप घुसला आणि प्रेक्षकांसह खेळाडूंच्याही काळजाचा ठोका चुकला. (IND VS SA T20 Match Snake Enter in Ground Snake viral video)

नेमकं काय घडलं?

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर रोहित राहुलची जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. पॉवरफ्लेमध्ये या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दोघेही तुफान फलंदाजी करत असताना, अचानक सापाने मैदानात एंट्री केली. यानंतर हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला.

मैदानावर अचानक साप आल्याचं पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर सापाला पकडताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. साप मैदानात आल्याचं पाहून सपोर्ट स्टाफ तिथे पोहोचला आणि सापाला पकडून बाहेर नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

भारताने आफ्रिकेला नमवत रचला इतिहास

दक्षिण आक्रिकेविरुद्ध सलग दुसरा टी20 सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता.

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करू शकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan : आमिर खानचे विवाहबाह्य संबंध; लग्न न करता मुलगा, भावाच्या आरोपाने खळबळ, कोण आहे जेसिका हाइन्स?

मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण

Mumbai Rain Video : पावसामुळे मुंबईची तुंबई! गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांची ताराबंळ, व्हिडिओ पाहा

Sambhajinagar : पाण्याच्या प्रवाहात नदीत मधोमध अडकली कार; भाविकांचा जीव टांगणीला, सुखरूप बाहेर काढण्यात यश

Coolie VS War 2: सोमवारी 'कुली'ने मारली बाजी, केली २०० कोटी कल्बमध्ये एन्ट्री; जाणून घ्या 'वॉर २'चं कलेक्शन

SCROLL FOR NEXT