kl rahul google
Sports

KL Rahul Statement: 'मी खेळाडूंना हेच सांगितलं होतं की..', वनडे मालिका जिंकल्यानंतर केएल राहुलने सांगितला काय होता प्लान

India vs South Africa 3rd ODI, KL Rahul Statement: भाारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने जिंकली आहे.

Ankush Dhavre

Ind vs Sa 3rd ODI Match:

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत जाऊन दुसऱ्यांदा वनडे मालिकेत पराभूत केलंय. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी पार्लच्या बोलँडमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी विजय मिळवला. यासह या मालिकेत २-१ ने बाजी मारली. या सामन्यात शतक झळकावणारा संजू सॅमसनचा विजयाचा हिरो ठरला आहे.

संजू सॅमसन बनला संकटमोचक..

गेल्या २ सामन्यात मोठी खेळी न करु शकणाऱ्या संजू सॅमसनवर जोरदार टीका केली जात होती. अखेर तिसऱ्या सामन्यात शतक झळकावत त्याने जोरदार कमबॅक केलं आहे. त्याचं हे शतक अतिशय खाल ठरलं आहे.

कारण ज्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता. त्यावेळी संजूने हे शतक झळकावलं आहे. त्याने तिलक वर्मासोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचू शकला.

या मालिकेतील विजयानंतर बोलताना भारताचा कर्णधार केएल राहुल म्हणाला की,'वर्ल्डकपमधील पराभवानंतर फिल्डवर कमबॅक करुन बरं वाटतंय. या खेळाडूंसोबत आम्ही आयपीएलमध्ये एकत्र खेळलो आहे. या खेळाडूंसोबत राहणं आणि खेळणं मला आवडतं. मी या खेळाडूंना नेहमी एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे खेळाचा आनंद घ्या आणि आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. याव्यतीरिक्त दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार करु नका.' (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की,'हे सर्व उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. काही खेळाडूंना आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नव्हता, त्यामुळे त्यांना जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो. सर्वांची भूमिका स्पष्ट असायला हवी, सर्वांनी आपलं १०० टक्के द्यायला हवं. याहून जास्त मला काहीच म्हणायचं नाही.'

या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनवर केएल राहुलने कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की,'संजूने आयपीएल स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. मात्र दुर्देवाने त्याला टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आज त्याने चांगला खेळ केला हे पाहून बरं वाटलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT