jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: सिराजनंतर बुमराहचा कहर! कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदाच केला हा कारनामा

Jasprit Bumrah Record News: पहिल्या दिवशी मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ५ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test:

केपटाऊनच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांकडून दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी अनेक मोठ मोठे रेकॉर्ड झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील रेकॉर्ड पाऊस पाडला जात आहे. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ५ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

तिसऱ्यांदा केला हा कारनामा..

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने १ गडी बाद केला होता. तर दुसऱ्या दिवशी त्याने ४ गडी बाद करुन ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला.

यासह त्याने दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. त्याचा दक्षिण आफ्रिकेतील रेकॉर्ड पाहिला तर त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

या सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ गडी बाद केले होते. एकीकडे जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत होता. तर दुसरीकडे एडन मार्करम खेळपट्टीवर टीकून होता. ज्या खेळपट्टीवर फलंदाज फलंदाजीत संघर्ष करताना दिसून येत होते. त्याच खेळपट्टीवर एडन मार्करमने शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेला आघाडी मिळवून दिली आहे.

जवागल श्रीनाथची बरोबरी..

या सामन्यात ५ गडी बाद करताच त्याने जवागल श्रीनाथची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळताना सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करण्याचा रेकॉर्ड जवागल श्रीनाथ यांच्या नावे होता. त्यांनी हा कारनामा ३ वेळेस करुन दाखवला होता. आता बुमराहने देखील हा कारानामा ५ वेळेस करुन दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT