मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) सुरूवात चांगली झाली. भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत दमदार विजय मिळवला. या विजयात विराट कोहलीची महत्वाची भूमिका राहिली. कोहलीने नाबाद ८२ धावा कुटत पाकिस्तानच्या खिशातून सामना खेचला.
विराटच्या या दमदार खेळीनंतर त्याच्यावर चौहेबाजूंनी कौतुकांचा वर्षाव होतोय. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने विराटला (Virat Kohli) अजब सल्ला दिला आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पाकिस्तानी संघाचं कौतुक केलं. (Cricket News)
पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला, त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. असं शोएब अख्तर म्हणाला. विश्वचषक स्पर्धेची ही फक्त सुरुवात आहे. या स्पर्धेत पुन्हा दोन्ही संघ नक्कीच आमने-सामने येतील. याच विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान आणि भारत पुन्हा सामना खेळतील, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला.
पाकिस्तानी संघाला धीर देऊन झाल्यानंतर आपल्या विश्लेषणात्मक व्हिडीओमध्ये शोएब अख्तरने सामन्याचा निकाल एकहाती फिरवणाऱ्या विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला. ५३ चेंडूंमध्ये ८२ धावा करणाऱ्या विराटची ही खेळी त्याच्या टी-२० कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचं शोएबने म्हटलं.
मात्र, विराटचं कौतुक केल्यानंतर शोएब अख्तरने थेट विराटने टी-२० मधून निवृत्ती घ्यावी, अशी इच्छा बोलून दाखवली. त्याने दमदार पुनरागमन केलं आहे. मात्र त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावं, असं मला वाटतं. कारण, त्याने त्याची संपूर्ण ऊर्जा टी-२० क्रिकेटमधून लावू नये या मताचा मी आहे, असं शोएब अख्तर म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.