IND vs PAK: हिंदूंवरील विधानानंतर वकार यूनूसने मागीतली माफी
IND vs PAK: हिंदूंवरील विधानानंतर वकार यूनूसने मागीतली माफी  Twittter
क्रीडा | IPL

IND vs PAK: हिंदूंवरील विधानानंतर वकार यूनूसने मागीतली माफी

वृत्तसंस्था

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने बुधवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे. T20 विश्वचषक 2021 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर वकार युनूसने आपल्या खेळाडूंचे कौतुक करताना आक्षेपार्य उद्गार काढले होते. तो म्हणाला होता की ''मुहम्मद रिझवानने हिंदू लोकांच्या मध्ये नमाज अदा केली''. ही सर्वात मोठी गोष्ट होती.

आता वकार युनूसने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर माफीनामा लिहिला आहे आणि म्हटले आहे की, "प्रसंगाचा उत्साह पाहता, मी असे काहीतरी बोललो होतो जे मला बोलायचे नव्हते, ज्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. माझे असे म्हणणे अजिबात नाही, ती माझी चूक होती. खेळ लोकांना जात, रंग किंवा धर्म विचारात न घेता एकत्र आणतात. माफी मागतो."

खरं तर, टी 20 विश्वचषक 2021 च्या भारताविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात, पाकिस्तान संघाचा सलामीवीर मुहम्मद रिझवानने शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतकानंतर गुडघ्यावर बसून देवाचे आभार मानले. याशिवाय ड्रिंक्स ब्रेक दरम्यान रिझवानने नमाज अदा केली होती. याबद्दल वकार युनूसने म्हणाला की, त्याला त्याच्या फलंदाजीपेक्षा ही गोष्ट जास्त आवडली की त्याने हिंदू लोकांमध्ये नमाज अदा केली.

स्थानिक माध्यमांवर बोलताना वकार युनूस म्हणाला, "बाबर आणि रिझवानची फलंदाजी, स्ट्राईक-रोटेशन, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अप्रतिम होते. सर्वात चांगली गोष्ट, रिझवानने जे केले, माशाल्लाह, त्याने हिंदूंना घेरले. जमिनीवर नमाज अदा केली, ती होती. माझ्यासाठी खरंच खास." मात्र, त्याचे हे विधान पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांव्यतिरिक्त जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आवडले नाही, त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT