pakistan twitter
Sports

IND vs PAK : पाकिस्तानचं डोकं फिरलंय! म्हणे भारताने जादूटोणा केलाय..११ खेळाडूंसाठी २२ मांत्रिक; चर्चेचा VIDEO व्हायरल

Champions Trophy 2025: भारत- पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. या विजयानंतर पाकिस्तानने भारतावर मोठा आरोप केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफीत रविवारी हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. या पराभवामुळे यजमान पाकिस्तानचा संघ दुसऱ्याच सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या सामन्यानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. या विजयानंतर संपूर्ण भारतात एकच जल्लोष दिसून आला. भारती फॅन्स फटाके फोडून जल्लोष साजरा करताना दिसून आले.

तर तर दुसरीकडे पाकिस्तानचे फॅन्स निराश दिसून आले. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात काही लोकं पाकिस्तानच्या पराभवाबाबत चर्चा करताना दिसून येत आहेत. दरम्यान एका व्यक्तीने तर भारतीय संघ जादूटोणा करुन जिंकले आहेत, असा आरोप केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोकं एका पॉडकास्टमध्ये भारत- पाकिस्तान सामन्याबाबत चर्चा करताना दिसून येत आहेत. एक व्यक्ती म्हणाला, भारतीय संघ जिंकावा म्हणून या संघाने २२ मांत्रिक दुबईत पाठवले होते. या व्यक्तीने असा दावा केलाय की, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूसाठी २ भटजी पाठवण्यात आले होते, जे खेळाडूंसाठी जादूटोणा करत होते.

हेच कारण होतं की, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानात यायला नकार दिला. कारण हे खेळाडू जर पाकिस्तानात आले असते, तर २२ मांत्रिकांना पाकिस्तानात घेऊन येता आलं नसतं. या २२ मांत्रिकांमुळेच पाकिस्तानचे खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत.

ही चर्चा इथेच थांबली नाही, तर एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, भारताने मैदानात ७ भटजी पाठवले होते. त्यावेळी भारतीय संघातील खेळाडू मैदानातही आले नव्हते. दरम्यान मांत्रिकांनी आधी जादूटोणा केला आणि त्यानंतर भारतीय खेळाडू मैदानात उतरले, असा दावा केला जातोय. आता या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी पाकिस्तानी फॅन्सची फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT