Team India players during a practice session as Arshdeep Singh misses out, while Kuldeep Yadav and Abhishek Sharma are set to feature in the high-voltage IND vs PAK clash. twitter
Sports

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियात मोठा बदल, Playing 11मधून धाकड गोलंदाज आऊट

T20 World Cup 2026: २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या २७ व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आलेत. अर्शदीप सिंग या सामन्यात खेळणार नाहीये. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल अपेक्षित आहेत.

Bharat Jadhav

भारत आणि पाकिस्तान यांचा सामना लवकरच सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे. असा दावा केला जात आहे की, अर्शदीप सिंग या सामन्यात खेळणार नाही. भारतीय संघ त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता आहे. शिवाय अंतिम अकरा जणांमध्ये अभिषेक शर्माला संधी देण्यात आलीय.

या सामन्यात संजू सॅमसनला बाहेर करण्यात आलंय. आजारपणामुळे अभिषेक शेवटचा सामना खेळू शकला नव्हता पण तो आता तंदुरुस्त आहे. पण प्रश्न असा आहे की अर्शदीप सिंगला का वगळले जात आहे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्ये होणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी दिली जाणार नाही. कोलंबोमधील फिरकीला अनुकूल परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर, भारतीय संघाने कुलदीप यादवला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध सातत्याने विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT