IND vs PAK LIVE T20 World Cup 2024  
क्रीडा

T20 World Cup IND vs PAK:पाकिस्तानकडून टीम इंडिया पहिल्यांदाच ऑलआऊट! भारताने ठेवलं माफक १२० धावांचं आव्हान

IND vs PAK LIVE T20 World Cup 2024 : T२० विश्वचषक २०१४ चा १९ वा सामना दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Bharat Jadhav

नासाऊ काउंटीमधील स्टेडियमवर भारतीय फंलदाजीची घसरगुंडी झालेली दिसली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या बाबर आझमचा हा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाच्या संघाला फक्त ११९ करता आल्या. भारताकडून ऋषभ पंतनेच सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

सामना सुरू झाल्यानंतर पावसाने बॅटिंग केली. सामन्याचा एक षटकार झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला होता. सामना थांबला तोपर्यंत भारताने एकही विकेट न गमावता ८ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 8 आणि विराट कोहली खाते न उघडता क्रीजवर होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर विराट कोहली अवघ्या ४ धावा करून बाद झाला. नशिम शहाने विराटला बाद केले आहे. त्यावेळी भारताचा स्कोअर १२/१ असा होता.

दरम्यान भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयापासून केली होती. मागील सामन्यात भारताने आयर्लंडचा पराभव केला होता. तर पाकिस्तानी संघाला मागील सामन्यात अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निकालापूर्वीच कणकवलीत लागले नितेश राणेंच्या विजयाचे बॅनर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT