IND vs Pak, Asia Cup 2022  Saam TV
Sports

India vs Pakistan : ...अन् पाकिस्तानचा खेळाडू मैदानावरच रडला; भारत-पाक सामन्यांत नेमकं काय घडलं?

नसीम शहाचा रडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला

Satish Daud

IND vs Pak, Asia Cup 2022 : भारताने आशिया कप 2022 स्पर्धेची सुरूवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने 2019 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा देखील काढला. दरम्यान, पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांचा वेगवाग गोलंदाज नसीम शहा हा रडत-रडत मैदानाबाहेर गेला. नसीम शहाचा रडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. (India vs Pakistan Latest News)

नसीम शहा याने भारताविरुद्धच्या (Team India) सामन्यात चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकांत भारताचा सलामीवर फलंदाज केएल राहुलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याने विस्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादवलाही बाद केलं. मात्र, चांगली नसीमने चांगली गोलंदाजी करून सुद्धा पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला.

पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर 19 वर्षीय नसीम शहा हा रडत रडत मैदानाबाहेर गेला. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भारतीय संघाचे चाहते नसीम शहाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. इंटरनेटवर हा व्हिडीओ अनेकांनी बघितला आहे. (India vs Pakistan Match Viral Video)

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अत्यंत रंगदार झाला. भारताने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या टॉप खेळाडूंना माघारी पाठवलं. भुवनेश्वर कुमारला हार्दिक पांड्या, आवेश खान, अर्शदीप सिंगची चांगलीच साथ लाभली. नियमित अंतरावर विकेट्स गमावल्यानंतर पाकिस्तान संघ 19.5 षटकात 147 धावांवर गारद झाला.

148 धावांच्या लक्षाच्या पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात नसीम शहाने केएल राहुलला बाद केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीने रोहितसोबत छोटेखानी भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठराविक अंतरावर दोघांनीही आपली विकेट्स फेकली. विराट आणि रोहित बाद होताच भारतीय संघाची अवस्था 3 बाद 53 अशी झाली.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या सुर्यकुमार यादवने रविंद्र जडेजासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुर्यकुमार यादवही बाद झाला. हार्दिक पांड्याने जडेजासोबत उर्वरित षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला ५ विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने 2019 साली टी-20 विश्वचषकात झालेल्या पराभवाचा पाककडून बदला घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT