IND vs PAK Asia Cup 2022 Saam Tv
Sports

IND vs PAK Asia Cup 2022: हिटर हार्दिक! अखेरच्या ओव्हरमध्ये सिक्स ठोकून टीम इंडियाचा पाकिस्तानवर विजय

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला.

साम वृत्तसंथा

India vs Pakistan Asia Cup 2022 Match : आजच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने विजयाचा षटकार मारत विजय खेचून आणला. शेवटपर्यंत हा सामना रोमहर्षक राहिला, टीम इंडियाही सामन्याच्या शेवटला दडपणाखाली आली होती, पण हार्दिक पांड्याने विजय खेचून आणला.

नाणेफेक जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे संपूर्ण संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला. भुवनेश्वर कुमारने बाबर आझमला बाद करून पाकिस्तानला पहिली झटका दिला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला बॅकफूटवर ठेवले. भुवीने चार आणि हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. पुढ टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली.

टीम इंडियापुढे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १४८ धावांच आव्हान ठेवलं. या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने संघासाठी सर्वाधिक ४३ धावा केल्या. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचे सुरुवातील तीन गडी स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताने संयमी खेळ दाखवत पाकिस्तानला धूळ चारली.

पाकिस्तान टीमच्या विरोधात फलंदाजीसाठी उतरलेली टीम इंडियाचे दोन षटकानंतर एक विकेटसह १० धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने केवळ १२ धावा करत झेलबाद झाला. रोहित पाठोपाठ विराट कोहली देखील झेलबाद झाला. टीम इंडियाचा अर्धा डाव संपला, तेव्हा भारताचा तीन विकेट गमावून ६२ धावा झाल्या होत्या. त्यानंतर सुर्यकुमारही १८ चेंडूमध्ये १८ धावा करत बाद झाला. त्यामुळे टीम इंडिया दडपणाखाली आली होती. पण ऑलराऊंडर असणाऱ्या हार्दिक पांड्याने विजय खेचून आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT