rohit sharma twitter
क्रीडा

IND vs NZ: रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी! पहिल्याच कसोटीत सेहवागचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

Virender Sehwag: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला मोठा रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma News In Marathi: न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिली लढत १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे.

या मालिकेसाठी दोन्ही संघांनी आपल्या स्कॉडची घोषणा केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माही अॅक्शनमध्ये दिसणार आहे. दरम्यान रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

रोहित शर्माकडे सिक्सर किंग बनण्याची संधी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुत रंगणार आहे. या सामन्यात फलंदाजी करताना ५ षटकार खेचताच त्याच्या नावे एका रेकॉर्डची नोंद होणार आहे. रोहितने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ८७ षटकार खेचले आहेत.

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग या यादीत अव्वल स्थानी आहे. सेहवागच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ९१ षटकार खेचण्याची नोंद आहे. या यादीत रोहितला अव्वल स्थानी येण्याची संधी येणार आहे.

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची मालिका

भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र भारताचं फायनलचं तिकीट अजूनही कन्फर्म झालेलं नाही. भारतीय संघाला इथून पुढे ८ कसोटी सामने खेळायचे आहेत.

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन्ही संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत ८ पैकी ५ सामने जिंकावे लागणार आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांची मालिका भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड असणार आहे. या मालिकेत जर भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला केवळ २ सामने जिंकावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT