virat kohli rohit sharma saam tv news
Sports

IND vs NZ Semi Final 2023: वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये 'गंजते' विराट अन् रोहितची बॅट; असा राहिलाय रेकॉर्ड

Virat Kohli And Rohit Sharma Record In World Cup Semi Final: वर्ल्डकपच्या सेमीफायनमलमध्ये कसा राहिलाय या दोन्ही खेळाडूंचा रेकॉर्ड?

Ankush Dhavre

Virat Kohli And Rohit Sharma Record In World Cup Semi Final:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहीला सेमीफायनलचा थरार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणाार आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आमने सामने आले होते.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. दरम्यान भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माची बॅट या सामन्यात चालणं अतिशय गरजेचं असणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे. मात्र सेमीफायनलच्या सामन्यात या दोन्ही खेळाडूंचा रेकॉर्ड चिंता वाढवणारा राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

वर्ल्डकप सेमीफायनलमधय्ये विराट, रोहितची कामगिरी...

विराट कोहली आपला चौथा वर्ल्डकप खेळतोय. यापूर्वी त्याला ३ वनडे वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव आहे. मुख्य बाब म्हणजे या ३ स्पर्धेत भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने २०११ वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती.

या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात त्याला केवळ ९ धावा करता आल्या होत्या. तर २०१५ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलच्या सामन्यात विराट कोहली १ धाव करत माघारी परतला होता. २०१९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्येही विराटने निराशाजनक कामगिरी केली होती. या सामन्यातही तो १ धाव करत माघारी परतला होता. (Latest sports updates)

रोहित शर्मा तिसरा वर्ल्डकप खेळतोय. तर कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच वर्ल्डकप आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अवघ्या ३४ धावा करता आल्या होत्या. तर २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये तो १ धाव करत माघारी परतला होता. या दोन्ही खेळाडूंना सेमीफायनलमध्ये मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे हा सामना जर भारतीय संघाला जिंकायचा असेल तर या दोन्ही खेळाडूंनी मोठी खेळी करणं गरजेचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT