IND vs NZ: आश्विन हिट, कोहली सुपरहिट; दोघांनी रचले नवे रेकॉर्ड Twitter/ @BCCI
Sports

IND vs NZ: आश्विन हिट, कोहली सुपरहिट; दोघांनी रचले नवे रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची आज मुंबईत सांगता झाली.

वृत्तसंस्था

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची आज मुंबईत सांगता झाली. टीम इंडियाने (Team India) ही कसोटी ३७२ धावांनी जिंकून मालिका १-० ने जिंकली. या सामन्यात अनेक विक्रम झाले. यात सर्वात मोठा विक्रम भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर झाला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० सामने जिंकणारा कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, मालिकेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने (Rravichandran Ashwin) अनिल कुंबळेला (Anil Khumble) एका विक्रमाच्या बाबतीत मागे टाकले आहे.

कोहलीने भारतासाठी ९७ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान भारताने ५० सामने जिंकले तर २८ सामने गमावले आणि १९ अनिर्णित राहिले. भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली २५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाने यापैकी १५३ सामने जिंकले आहेत आणि ८८ गमावले आहेत. यादरम्यान ५ सामने टाय झाले आणि ८ सामन्यांचा निकाल लागला नाही. T २० बद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने ९५ सामन्यात ५९ सामने जिंकले आहेत. ३१ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. दोन सामने बरोबरीत सुटले तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.

रविचंद्रन अश्विनने या कसोटीत विशेष कामगिरी केली आहे. अनिल कुंबळेनंतर घरच्या मैदानावर ३०० बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. कुंबळेने ३५० बळी घेतले आहेत. या यादीत अश्विन आता दुसऱ्या स्थानावर तर हरभजन सिंग (२६५ विकेट) तिसऱ्या स्थानावर आणि कपिल देव (२१९ विकेट) चौथ्या स्थानावर आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT